अखेर प्लॅन टू नाॅनप्लॅन झाले !

अखेर प्लॅन टू नाॅनप्लॅन झाले !

शनिवार दिनांक १८ मार्च २०१७ रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पिय कामकाजाच्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल करत योजनेतर व योजनांतर्गत खर्चाचे एकत्रीकरण करण्यात अाले. त्यामुळे योजना अाणि योजनाबाह्य खर्च ही विभागणी बंद झाली असून सर्व पगार हे अनिवार्य खर्चात दाखविले गेले अाहेत. त्यामुळे "प्लॅन टू नाॅनप्लॅन " हा विषय मार्गी लागला.

मागील १२ वर्षापासून प्लॅनमधिल सुमारे २९हजार शिक्षक  शिक्षकेतरांना  नियमित पगार मिळत नव्हता. खरे तर प्लॅन टू नाॅनप्लॅन १००% अनुदानपात्र शाळा/वर्ग तुकडी पाच वर्षे पुर्ण झाल्यावर नाॅनप्लॅनमध्ये जाणे अनिवार्य असते. माध्यमिक विभागापेक्षा प्राथमिक विभागातील शिक्षक शिक्षकेतरांची संख्या अधिक होती. (ते शिक्षक, शिक्षक मतदार संघाचे मतदार नसतात.) राज्यातील शिक्षक व पदवीधर अामदारांनी त्या त्या वेळेस योग्यरितीने पाठपुरवठा करून व संसदिय अयुधांचा वापर करून हा प्रश्न योग्य वेळेतच सोडविणे अावश्यक होते, दुर्दैवाने तसे झाले नाही. सुमारे बारा वर्षात प्लॅन मधील शाळा/वर्ग तुकड्या एकदाही नाॅनप्लॅनमध्ये समाविष्ठ झाल्या नाहीत . हे ख-या अर्थाने शिक्षक बंधुभगिनींनी निवडून दिलेल्या शिक्षक अामदारांचे अपयश अाहे.  अखेर केंद्रशासनाच्या दि. २३
अाॅगस्ट २०१६ च्या पत्रानुसार योजनेतर व योजनांतर्गत खर्चाचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या सुचनांनुसार या प्रश्नाचे गांभिर्य लक्षात घेऊन दि. १८ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या मा. मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन दि. २७ जानेवारी २०१७ रोजी शासनाने परिपत्रक (GR) पारित करून अनिवार्य खर्चामध्ये मूळ अस्थापनाविषयक खर्च - वेतन , निवृत्ती वेतन , व्याजप्रदाने या विषयांचा समावेश करण्यात अाला.

बुधवार दिनांक २८ संप्टेंबर २०१६ रोजी अाझाद मैदानावर फक्त " प्लॅन टू नाॅनप्लॅन " या एकमेव प्रश्नासाठी  राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेने तिव्र अांदोलन केले. मनोहर कदम, सुदाम भोजणे, जगदिश उगले, शामवेल मावची यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरवठ्यास अखेर यश अाले. त्यामुळे राज्यातील सुमारे २९ हजार शिक्षक शिक्षकेतरांना यापुढे नियमित वेतन मिळेल.

Comments

  1. अभिनंदन मा.श्री.हांडे सरजी, मा.श्री.कदम सरजी

    ReplyDelete
  2. Thank you so much.Shree Hande Sir

    ReplyDelete
  3. Hande sir
    Thank u so much. Keep it up..

    ReplyDelete
  4. Hande sir
    Thank u so much. Keep it up..

    ReplyDelete
  5. अभिनंदन हांडे सरजी

    ReplyDelete
  6. अभिनंदन हांडे सरजी

    ReplyDelete
  7. अभिनंदन हांडे सरजी

    ReplyDelete
  8. अभिनंदन हांडे सरजी

    ReplyDelete
  9. अभिनंंदन सर

    ReplyDelete
  10. अभिनंदन ! हांडे सर अाणि टीम

    ReplyDelete
  11. सर्वांचे मन:पूर्वक अाभार!!

    ReplyDelete
  12. सर्वांचे मन:पूर्व अाभार!!

    ReplyDelete

Post a Comment