हक्काचे वेतन असूनही अर्थिक भुर्दंड कायम ! त्यातच निधी उपलब्धतेचा दुष्काळ अन राजकारणाला आला सुकाळ !!

🔹हक्काचे वेतन असूनही अर्थिक भुर्दंड कायमच ! त्यातच  निधी उपलब्धतेचा दुष्काळ अन राजकारणाला आला सुकाळ !!🔹

        एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेल पण अजूनही खात्यावर वेतन जमा झालेली नाहीत. अशाप्रकारे वेतन नियमित न होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. "प्लॅन टू नाॅन प्लॅन " लढ्याच्या वेळी हे सर्वच अनुभव घेतले आहेत. मुंबई आणि मुंबई लगतच्या परिसरात राहणाऱ्या सर्व शिक्षकांचे बहुतांशी हाऊसिंग लोन , एलआयसी हप्ते , पर्सनल लोन , शैक्षणिक लोन  यासारखे अनेक कर्ज व त्यासाठी नियमित EMI हे बहुतांशी दहा तारखेच्या अगोदरच असल्यामुळे अनेकवेळा  EMI  बाउन्स होतात. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणावर  नाहक दंड भरावा लागतो. अर्थिक पत (सिबील खराब होणे) सुध्दा घसरते.

वेतन विलंबामध्ये महत्वाचे कारण म्हणजे राजकारण!  मागणी नसताना मुंबई बँकेमध्ये असणारे पुल अकाऊंट . (त्यामुळे आनखी दोन-तीन दिवस उशीर होतो) टप्पा अनुदानावर (अंशतः अनुदानित ) आलेल्या शाळांना तर दोन-दोन, तीन-तीन  महिने पगार सुद्धा नसतो. 

खरंतर पगार ह्या विषयाचा राजकारण होणे हे दुर्दैवी आहे. 

-- ज्ञानदेव लक्ष्मण हांडे(राज्य कार्याध्यक्ष),
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना.
उमेदवार - मुंबई शिक्षक मतदार संघ

Comments