धरणे अांदोलन, bmc

*चलो अाझाद मैदान.! चलो अाझाद मैदान.!*

  *।। धरणे अांदोलन ।।*

शुक्रवार दि. १४/१०/२०१६ वेळ ११ते ५
*********************************

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी प्राथमिक 43 विनानुदानित शाळा मधील सर्व शिक्षकांना सूचित करण्यात येते की दिनांक-14/10/2016 वार- शुक्रवार रोजी  राज्य खाजगी प्राथ.व माध्य.शिक्षक संघटनेच्या वतीने ईछ्या मरण मगणाऱ्या १५ ते २० वर्षांपासून अल्प मानधनावर काम करणा-या (पहिली ते चौथी )शिक्षकांचे धरणे आंदोलन आयोजित केले आहे.

सर्वच शाळा ह्या मराठी,हिंदी,ऊर्दू माध्यमांच्या खाजगी प्राथमिक शाळा अाहेत, तसेच सर्वच शाळा या मुंबई उपनगरातील डोंगराळ व झोपडपट्टी भागातील अाहेत. तेथे शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्थिक दुर्बल घटकांतीलच अाहेत. (मुंबईतला उरलेला मराठी टक्का ) जर या प्राथमिक शाळांना अाता बी.एम.सी. ने अनुदान दिले नाही तर त्याचे दुरगामी परिणाम भविष्यात संबधित खाजगी माध्यमिक शाळांवर पडतील. परीणामी अतिरिक्त शिक्षकांची (माध्यमिक) संख्या झपाट्याने वाढणार यात शंका नाही. सुमारे ६२ शाळा व काही अनुदानाच्या प्रतिक्षेत असणा-या यांचीही संख्या बरीच मोठी अाहे.

खाजगी माध्यमिक शाळेची विदयार्थी संख्या ही प्राथमिक शाळेच्या गुणवंतवर अावलंबून असते. मनपा ने जर त्यांना अनुदान दिले तर पोषण अाहार, मोफत पाठ्यपुस्तकेही व इतर अनेक सुविधा मिळतील म्हणुन प्राथमिक शाळांना अनुदान मिळणे फार निकडीचे अाहे.

मुंबई सारख्या शहरात १५ ते २० वर्ष अल्प मानधनावर काम करणे अाजच्या महागाईच्या काळात शक्य नाही. म्हणुन अनुदान सुरू होणे म्हणजे शिक्षण व शिक्षकांना संजीवनीच मिळेल..!

प्राथमिक शाळा जगल्या तर माध्यमिक शाळा वाचतील...!

*"प्राथमिक शाळा वाचवा,शिक्षण वाचवा.!*

म्हणुन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच अनुदान प्राप्तीसाठी सहकार्य करावे. ही नम्र विनंती.
सर्व शिक्षक शक्षकेत्तर बंधुभगिनिंनी  जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहावे व आंदोलन यशस्वी करावे हि नम्र विनंती.

अापला नम्र,
*ज्ञानदेव हांडे*
राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना , महाराष्ट्र राज्य .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments