राजकारणातील नेतृत्वाबाबत..

राजकारणातील नेतृत्वाबाबत...

समाजामध्ये लिडरशिपचे (Leadership) दोन प्रकार दिसतात.
१) इमेज बेस लिडरशिप (Image Base Leadership)   २) नाॅलेज बेस लिडरशिप ( Knowledge Base Leadership)

विस्ताराने :- १) इमेज बेस लिडरशिप (Image Base Leadership) : -  इमेज बेस लिडरशिप अापल्याला सर्वच ठिकाणी बघायला मिळते. अशा लिडरशिपकडे गाडी असते , बंगला असतो. त्याचबरोबर चमच्यांचा लवाजमा असतो. असे लिडर पांढरेशुभ्र कपडे घालतात , डोळ्यावर गाॅगल लावतात अाणि पांढ-याशुभ्र अलिशान गाडीतून फिरतात.

त्यांच्यामागे त्यांचे चमचे , दलाल हुजरेगिरी करतात. परंतु ही प्रतिमा केवळ एका कुरकुरेच्या पाकीटासारखी असते. ज्यात ९०% हवा असते. अशा लिडरशिपपासून समाजाचे कधीच पोट भरत नाही. ते समाजाला कधीही हक्क , अधिकार मिळवून देवू शकत नाहीत. कारण त्यांचा विश्वास चमकधमक , खोटेपणा यांवर असतो.यांच्याकडून समाजाचे भले कधीही होत नाही. पण त्यांचे व त्यांच्या चमच्यांचे मात्र भले झालेले असते.

२) नाॅलेज बेस लिडरशिप (Knowledge Vase Leadership ) :-  नाॅलेज बेस लिडरशिप कुठल्याही प्रकारचा दिखावा करत नाही.समाजात मानसन्मान मिळावा म्हणुन कामही करत नाही. त्यांचे उद्दिष्ठ केवळ अाणि केवळ अापल्या समाजाच्या हितासाठी कार्यरत रहाणे , त्यांच्या हक्काप्रती जागरूक राहून समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे , समाजात प्रबोधनात्मक चळवळ निर्माण करणे असे असते. अशी लिडरशिप अापणास हजारात एखादी दुसरी पाहण्यास मिळते. अशा लिडरशिपला समाजातील अनेक लोकांचा विरोध सहन करावा लागतो मात्र ही लिडरशिप तावून सुलाखून निघते. जरी या लिडरशिपला अायुष्यात यश नाही मिळाले तरी ते लोकांच्या मनावर शेकडो वर्षे राज्य करतात. समाजातीलमोठ्या परीवर्तनाचा पाया ते रचत असतात.

म्हणुन समाजातील सर्व स्तरांवरच्या लोकांनी या दोन लिडरशिपमधील फरक ओळखून सत्तेवर सर्वांना प्रतिनिधीत्व , समता , न्याय यावर अाधारीत समाजव्यवस्था निर्माणाच्या कार्यास हातभार लावावा हीच अपेक्षा !

Comments

Post a Comment