अखेर अाकोला जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांचे बंद झालेले वेतन पुर्वरत सुरू.

(अाकोला २७ एप्रिल) अखेर अाकोला जिल्ह्यातील  2 मे 2012 नंतर नियुक्त 26 खाजगी प्राथमिक शिक्षकांचे बंद झालेले वेतन पुर्वरत सुरु.
▪ राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या आंदोलनाला यश
▪ शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर (प्राथमिक) साहेबांचा यांचा आणखी एक चांगला निर्णय
अकोला जिल्ह्यातील 2 मे 2012 नंतर नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर साहेब यांनी दिले होते. यामुळे एकाच वेळी 26 शिक्षकांच्या कुटुबांवर मोठे संकट आले होते.
      2 मे 2012 नंतरच्या नियुक्तीस तत्कालीन शिक्षणाधिकारी दोषी असुन यात शिक्षकांचा काही दोष नाही. असे असतांनाही शिक्षकांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत "राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना " यांच्या वतीने 4 मार्च रोजी संघटनेचे अध्यक्ष मनिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी यांच्या कक्षातच " ठिय्या आंदोलन " करण्यात आले होते. यावेळी शिक्षणाधिकारी श्री.दिग्रसकर साहेब यांनी 25 मार्च पर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
अखेर सोमवार  दि. 27/03/2017 रोजी सदरहु सर्व 26 शिक्षकांचे वेतन पुर्वरत सुरु करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर साहेब यांनी दिले असुन त्यामुळे सदर शिक्षकांना  दिलासा मिळाला आहे. आज सदर पत्र घेतेवेळी संघटनेचे अध्यक्ष मनिष गावंडे, कोषाध्यक्ष प्रमोद गाठे, अकोला जिल्हाध्यक्ष वसिम मुजाहीद, पार्थीकर सर, राहुल भगत , आशिष शर्मा, मुरमुरे सर, मानकर सर, घोंगे सर, भिसे सर, शोएबुद्दीनआदी उपस्थित होते.

Comments