अाम्हांला आमचा हक्क हवा, भिक नको. DCPS /NPS धारक मृत कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी जागे व्हा...
आमदार श्रीकांत देशपांडे आणि दत्तात्रय सावंत यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत आमदार कपिल पाटील आणि अन्य सदस्यांनी प्रश्न विचारला होता. या कर्मचाऱ्यांना कोणतीच पेन्शन योजना लागू झालेली नव्हती. त्यादरम्यान मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची आबाळ झाली होती. त्याबाबत मागच्या अधिवेशनात कपिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी 13 जुलै 2016 समिती गठित झाल्याचे सांगितले होते. व तया समितीने तीन महत्वाच्या शिफारसी केल्या आहेत.
१) डिसीपीएस/एननीएस योजनेतील कर्मचार्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या खाती जमा असलेली संचित रक्कम व रुपये १०,००,०००/- प्रमाणे सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर करण्यात यावे.
२) सेवेत असताना मृत्यू झालेला कर्मचारी हा परिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा / एनपीएसचा सदस्य असला पाहिजे.
३) सदर कर्मचारी सेवेत रुजू दिनांकापासून ते त्याची सेवा दहा वर्ष होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू राहील.
वित्त मंत्री महोदयांना आमदार महोदयांनी खालील प्रश्न विचारावे..
1. 5 मे 2009 चा केन्द्र शासनाचा शासण निर्णय म्हणतो की DCPS /NPS धारकांचा मध्येच मृत्यू झाल्यास व अपंगत्व आल्यास जुनीच पेंशन योजना लागू राहिल एवढचं नव्हे तर 5 डिसेंबर 2012 रोजी प्रश्न क्रमांक 1903 अश्वमेध देवी (लोकसभा सदस्य) व 3 मे 2013 रोजी प्रश्न क्रमांक 6093 हरिभाऊ माधव जावळे (लोकसभा सदस्य) त्याच प्रमाणे 18 फेब्रूवारी 2014 रोजी प्रश्न क्रमांक 350 प्रभात झा व 19 डिसेंबर 2014 रोजी प्रश्न क्रमांक 394 दुष्यंत सिंह यांच्या प्रश्नाला उत्तर देत तत्कालीन वित्तमंत्री चिदंबरम साहेब यांनी अस म्हटल होत की DCPS /NPS योजना ही केवळ नियत वयोमानाने निवृत होणाऱ्या सरकारी कर्मचारी यांच्या मिळणाऱ्या मासिक
वेतनाला पर्याय आहे. मात्र अपंगत्व व मृत्यु अशा करणाने निवृत होणाऱ्या कर्मचारी याच्या कुटुंबियांना जुन्या पेंशन योजनेनुसार लाभ मिळतील.
2. वरील निर्णयाचा आधार घेत इतर राज्याचा सरकारनेही आपल्या राज्य कर्मचारी यांना या निर्णयांचा लाभ दिला.
अ) उत्तर प्रदेश 5 मे 2011 चा शासण निर्णय क्रमांक सा - 3 - 1613/दस - 2011-301(9)2011
ब)राजस्थान सरकार 9 मे 2013 चा शासण निर्णय क्रमांक f. 12(8)fd (Rules) /2008 jaipur
क) उत्तराखंड सरकार यांचा 9 डिसेंबर 2011 चा शासन निर्णय
जर मोठ्या मोठ उत्तरप्रदेश व लहान राज्य उत्तराखंड जर वरील प्रकारे आपल्या कर्मचारी यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना देऊ शकतात तर महाराष्ट्र सरकार कुटुंब निवृत्ती वेतन का देऊ शकत नाही?
एवढे सर्व लिखित पुरावे असुनही आपण ज्यांची सेवा दहा वर्षे झाली त्यांना दहा लाख व ज्यांची दहा वर्षांपेक्षा जास्त झाली त्यांच्यासाठी काय तर काहीच नाही अशी अट मान्य करून शांत बसने योग्य नव्हे. केन्द्र सरकार प्रमाणे DCPS /NPS योजना लागू केली अस म्हणारे केन्द्र सरकार प्रमाणे कुटुंब निवृत्ती योजना देण्यास का तयार नाही असा प्रश्न आमदार महोदय का विचारत नाही?
अाम्हांला आमचा हक्क हवा, भीक नको..
दहा लाख ही रक्कम ज्यांची सेवा जास्तीत जास्त दहा वर्षे झाली त्यांना व दहा वर्षा पेक्षा जास्त सेवा झाली व त्यानंतर मृत्यू झाल्यास काय मिळणार तर काहीच नाही फक्त जमा रक्कमेची 20% रक्कम अशा शिफारशी नको आम्हाला..
DCPS /NPS धारक बंधू भगिनींनो आपल्या मृत बांधवाच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी संघर्ष करावा लागेल कारण आजच्या संघर्षातुनच उद्याच भविष्य निर्माण होत असतं.
या निर्णया विरोधात महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन तीव्र आंदोलन करेल व सरकारच डोक ठिकाणावर आणेल.
एकच मिशन...
जुनी पेंशन......
Hum ape satu hai..
ReplyDeleteJuni penstion nikah pahije..
Hande sir bset of luck
ReplyDelete