राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचा अंशदायी पेन्शन योजना कपातीला विरोध

राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचा अंशदायी पेन्शन योजना कपातीला विरोध !

गेल्या काही दिवसांत नविन परिभाषित अंशदायी पेन्शन योजने संदर्भात (DCPS) शासनाने जी मार्गदर्शक तत्वे ठरवली होती, त्यांची अंमलबजावणी होताना अजिबात दिसत नाही.ज्या कर्मचा-यांची कपात झाली अाहे,परंतु त्या कपातीचे विवरणपत्र अद्याप कोणालाही मिळालेली नाहीत.

१) शालार्थ प्रणाली अंतर्गत सर्व कर्मचा-यांची वेतन देयके तयार होतात. त्यामध्ये दरमहा DCPS अंशदानाची कपात होते. शालार्थमध्ये दरमहा वेतनचीठ्ठी ज्याप्रमाणे येते त्याप्रमाणे DCPS कपातीची रक्कम बाबत चिठ्ठि येणे अावश्यक अाहे.

२) शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दिनांक २९ नोव्हेंबर २०१० अन्वये राज्यात कर्मचा-यांची DCPS अंशदानाची रक्कम कपात करण्यास प्रारंभ झाला. त्या शासन निर्णयामध्ये R1, R2, R3, R4 , R5, व R7 असे विविध प्रपत्रांमध्ये लेखे ठेवणे अपेक्षित अाहे.मात्र अद्यापही शालार्थ प्रणाली अंतर्गत असे कोणतेही प्रपत्र तयार होत नाही. तसेच DCPS कपाती बाबत कर्मचा-यांना कोणतीही चिठ्ठी प्राप्त होत नाही. तसेच प्रत्येक कर्मचा-याच्या अंशदानाच्या रक्कमेवर शासनाने समतुल्य रक्कम जमा करणे अावश्यक अाहे. सदर रक्कमांवर व्याज अाकारणी बाबत शासनाचे धोरण स्पष्ठ नाही.

३) DCPS योजने अंतर्गत कर्मचारी मृत पावला किंवा सेवानिवृत्त झाला तर त्याची रक्कम विहित मुदतीत मिळत नाही.

४)DCPS योजने अंतर्गत कर्मचा-यांना अग्रीम दिला जात नाही.

यामुळे तमाम DCPS  धारकांमध्ये कमालीचा असंतोष अाहे. राज्यात या प्रश्नावर अनेक जणांनी न्यायलयात याचिका दाखल केलेल्या अाहेत. म्हणुन  अंशदायी पेन्शन योजनेची कपात बंद करावी. अशी मागणी मा. शिक्षण मंत्री व मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांना पत्र लिहून राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेने  केली अाहे.

Comments