मुंबईतील शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन युनीयन बॅंकेकडून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडे वर्गकरण्याबातच्या शासन निर्णयाला विरोध !


मुंबईतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन युनियन बॅंक अाॅफ इंडियाडून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडे वर्ग करण्याचा शासन निर्णय दिनांक ३ जून,२०१७ रोजी शालेय शिक्षण विभागाने पारित केला अाहे.राज्यातील अनेक जिल्हा बॅंका अडचणीत अाहेत. काही जिल्हा बॅंका बुडण्याच्या मार्गावर अाहेत. त्यामुळे राज्यातील जिल्हा बॅंकामार्फत शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान वेळेवर होत नाहीत.त्यातील डिपाॅझिटस अजून मिळालेली नाहीत. म्हणुनच शिक्षक शिक्षकेतरांचे पगार राष्ट्रीयकृत बॅंकेकडे वर्ग करण्यात अाले. नाशिकची जिल्हा बॅंक अशीच अडचणीत असल्यामुळे तेथील शिक्षक शिक्षकेतरांचे पगार झालेले नाहीत.

सहकारी बॅंकेतील घोटाळे व भ्रष्टाचार सर्वश्रुत अाहे. याबाबत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी व केंद्रिय वित्त मंत्री मा.अरुण जेटली यांनीही राष्ट्रीयकृत बॅंकाबाबत विश्वास व्यक्त केला अाहे.

सहकारी बॅंका या भ्रष्टाचाराचे कुरण झालेल्या अाहेत. त्यामुळे ९ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी जाहिर केल्यानंतर अर्थविभागाने व केंद्रिय वित्तमंत्री मा.अरूण जेटली यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकामार्फत व्यवहार करण्यासंदर्भात व नोटा बदलण्यासाठी बंदी घालण्यात अाली होती. २००१ पूर्वी दि सारस्वत काॅ. अाॅप. बॅंक व दि महाराष्ट्र स्टेट काॅ अाॅप बॅंक  या बॅंकांमार्फत मुंबईतील शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन होत होते. या बॅंकादेखील कोअर बॅंकींग सुविधा देत होत्या. परंतु शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन वेळेत होत नसल्यामुळे या बॅंकांमधुन युनियन बॅंक अाॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बॅंकेतून करण्यात अाले. कारण या बॅंकेच्या शाखा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अाहेत. एटीएम सुविधाही सर्व ठिकाणी उपलब्ध अाहे. मुंबईतील शिक्षक हे नोकरीनिमित्ताने अालेले अाहेत. सुट्टीमध्ये तो अापल्या गावी जातो. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखा संपुर्ण राज्यभर नसल्यामुळे कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात अर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार अाहे. तसेच सदर बॅंकेच्या संचालक मंडळावर अर्थिक भ्रष्टाचाराचे अारोपही अाहेत. तर काही संचालकांवर एफ. अार. अाय. देखील दाखल झालेले अाहेत. त्यामुळे सहकारी बॅंक सोडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बॅंकेतून वेतन अदा करावे.

मुंबईतील सगळ्या सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते राष्ट्रीयकृत बॅंकेमार्फत सुरक्षितपणे अदा होत अाहेत. मात्र अामच्या शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन व भत्ते फक्त मुंबई जिल्हा बॅंकेमार्फतच सुरु करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने पारित करून दुजाभाव केला अाहे. पुन्हा राष्ट्रीयकृत बॅंकेमार्फत शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन व भत्ते अदा करावे. अशा अशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेने दिले अाहे.

Comments