१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांची जुनी भविष्य निर्वाह निधीची खाती सुरु करावी.

१ नोव्हेंबर २००५ ला किंवा त्यानंतर १००% अनुदानित खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/वर्ग/तुकड्यांवर कार्यरत असलेल्या ( मुळ नियुक्ती २००५ पूर्वीची असलेले) कर्मचार्‍यांना शासनाने जुनी पेन्शन देण्याचे नाकारले. काही कर्मचार्‍यांची सुरु असलेली भविष्य निर्वाह निधीची खाती बंद करुन त्यांना नविन अंशदायी पेन्शन योजनेची (DCPS) खाती सुरु करण्याचे अादेश खात्याकडून करण्यात अाले. त्याच काळात बहुतांशी अंशतः अनुदानित शाळा २००९ नंतर १००टक्के अनुदानावर अाल्या.जादा अार्युमान असलेल्या  विनाअनुदानित शाळाही याच काळात अनुदानावर अाल्या. त्यांनाही जुनी पेन्शन योजना नाकारली. त्यामुळे २००५ पुर्वीची नियुक्ती असलेल्या  कर्मचार्‍यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यापैकी बर्‍याच कर्मचार्‍यांना मा. उच्च न्यायालयाच्या अंतरीम निर्णयानुसार जुनी भविष्य निर्वाह निधी योजना पुर्वीप्रमाणे सुरु ठेवणेबाबत अादेशित करण्यात अाले.

मा. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक , पुणे यांचे पत्र क्रमांक अास्था - ब/१२१/शालार्थ/२०१४/३५६१, दिनांक २७/०३/२०१४ च्या पत्रानुसार दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर १००% अनुदानावर  अालेल्या शाळा/तुकड्या/पदावरील कर्मचार्‍यांना दिनांक २९/११/२०१० च्या शासन निर्णयानुसार नवीन अंशदान पेन्शन योजना लागू करण्यात अाली होती. म्हणुन बर्‍याच कर्मचार्‍यांनी कोर्टात धाव घेतली. मा. उच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयानुसार जुनी भविष्य निर्वाह निधी योजना पुर्वीप्रमाणेच सुरु ठेवावी, असा निर्णय झाला.

मा. शिक्षण उपसंचालक , मुंबई यांनी पत्र क्र. शिऊस/डिसीपीएस/२०१७/१५२५८, दिनांक २८ जून २०१७ रोजी ठाणे विभागासाठी भविष्य निर्वाह निधी खातीसुरु करण्याबाबत  परिपत्रक पारित केले. परिपत्रकानुसार मा.शिक्षण उपसंचालक यांनी ज्या कर्मचार्‍यांना मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम अादेशाचे पालन करुन भविष्य निर्वाह निधी क्रमांक देण्यात यावा. असे अादेश मा. अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, ठाणे यांना दिले अाहेत.

मुंबईमधील अशा अनेक कर्मचार्‍यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन अंतरिम अादेश प्राप्त केले अाहेत. मी अाज मंगळवार, दिनांक २२/०८/२०१७ रोजी मा. शिक्षण उपसंचालक यांचेकडे  या विषयावर सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती ज्या कर्मचार्‍यांचे अंतरिम अादेश न्यायालयाकडून प्राप्त झाले असतील अशा कर्मचार्‍यांची भविष्य निर्वाह निधीची खाती खोलण्याबाबत होकार दर्शवला. याबाबत राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेने अाज उपसंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहारही केला. हा नियमित पाठपुरवठा संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष, मनोहर कदम व रात्र शाळा अध्यक्ष, प्रा. वसंत भागवत यांनी केल्यामुळे जुनी भविष्य निर्वाह निधीची खाती सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला अाहे.

Comments