महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. जनतेत संभ्रम आहे. काॅंग्रेस अाणि राष्ट्रवादीला लोक पर्याय मानत नाहीत. भाजप नको म्हणुन मुंबईत लोकांनी शिवसेनेला मत दिलं. काॅंग्रेस अन राष्ट्रवादीला नाकारलं असे मत मांडणारे मुंबई शिक्षक आमदार कपिल पाटील पुढे असे प्रतिपादन करतात की महाराष्ट्रातील शेतकरी , सरकारी नोकरदार , असंघटीत कामगार वर्ग यांच्यात असंतोष धुमसत आहे. म्हणुन महाराष्ट्रात नितीशकुमार येत आहेत. सारा देश नितीशकुमार यांचेकडे पर्याय म्हणुन पाहतो आहे. त्याचे कारण त्यांचे संयमी नेतृत्व , त्यांचा अाजेंडा आणि व्यापक आघाडीचे राजकारण. मोदींना बिहारमध्ये रोखण्यात नितीशकुमार यशस्वी झाले. हे अधोरेखित करणारे कपिल पाटील यांना मात्र शिक्षकांनी निवडून दिले आहे याचा विसरच पडला आहे. डामडौलात जेदयू मध्ये प्रवेश केला. ज्याचा शिक्षकांना काडीमात्र फायदा झाला नाही. उलटपक्षी जेदयूने सर्व राजकीय समीकरणांना (महाराष्ट्रातील) फाटा देत एनडीएत (भाजप व मित्र पक्ष) सामिल होण्याचा निर्णय घेत बिहारमध्ये भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केल्यामुळे महाराष्ट्राच्या जेदयू प्रदेशाध्यक्षांची पूर्ती गोची झाली.
बिहारमध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची नितिशकुमार यांची भुमिका आश्चर्यकारक आणि क्लेशदायक आहे. त्यामुळे अापण अत्यंत दु:खी झालो. जेदयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्राची भूमिका मांडू. सर्वानुमते निर्णय जाहीर करु. अशा आशयाचे पत्र दिनांक २७ जुलै २०१७ रोजी मुंबई शिक्षक आमदार यांनी दिले. अलीकडेच जेदयूची राष्ट्रीय कार्यकारीणीची सभाही पार पडली. जेदयू भाजपसोबत गेल्यापासून कधीही मुहुर्त न मानणार्या मुंबई शिक्षक आमदारांना मुहुर्ताची गरज भासू लागली आहे.
शिक्षक आमदार की राजकारणी ! प्रथम छात्रभारती, मग शिक्षक भारती, नंतर लोकभारती, मध्येच गंगाजल फ्रंट, मग काॅंग्रेससोबत, आता जनता दल युनायटेडमध्ये. आता तीच जदयू एनडिएमध्ये सामिल झाली. बदलणार्या भूमिका पाहता भविष्यात ते भाजपसोबतही गेले तरी आश्चर्य वाटणार नाही. मग मुंबई शिक्षक आमदार शिक्षकांचे की आजपर्यंत भाजपविरुध्द यलगार करणार्या भाजपचे ! दररोज नवनवीन शासन निर्णय काढून शिक्षकांना देशोधडीला लावणार्या, गोरगरीबांचे अनुदानित शिक्षण मोडीत काढणार्या भाजपचे ?
शिक्षकाला राष्ट्रीय राजकारणापेक्षा स्वत:चे प्रश्न महत्वाचे आहेत. ज्या शिक्षक बंधु-भगिनींनी शिक्षक संघटनांच्या जोरावर (राजकीय पक्षाच्या बॅनरवर नाही) निवडून दिले. आपल्या राजकीय स्वार्थासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे बॅनर वापरत अाहेत. त्या राजकीय पक्षांच्या तत्वांशी काहीही संबंध नसताना जणूकाही सर्व शिक्षक बंधु-भगिनींनी तो पक्ष व त्याची ध्येय धोरणे स्विकारली असे अजिबात होत नाही. कोणीही शिक्षकांना कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधू नये. अन्यथा शिक्षकांनी दिलेल्या लोकशाहीतील पसंतीक्रमाच्या मताचा अनादर होईल. मग शैक्षणिक वातावरणात सुरु होईल फक्त आणि फक्त राजकारण! म्हणुनच शिक्षक प्रतिनिधी हा शिक्षकच असणे उचित. सरकार बदलले की निष्ठा बदलणारे नकोच नको ! मग सरकार कोणाचेही असो!! फक्त शिक्षक हितच व्हावे.
छान
ReplyDeleteThese MLA can do anything for their personal profit and not for teachers.
ReplyDeleteIt is required to start old pension plan to the employees who have appointment date before November 2005
ReplyDeleteIt is required to start old pension plan to the employees who have appointment date before November 2005
ReplyDeleteअगदी बरोबर हांडे सर
ReplyDelete