कंपनी शाळा विधेयक पास ! शिक्षक , पदवीधर अामदार नापास !!
शाहू , फुले , अांबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील , डाॅ. पंजाबराव देशमुख , बापुजी साळुंखे या महात्म्यांनी अापल्या देशातील बहुजन समाजातील गोरगरीब जनता शिक्षित झाली पाहिजे यासाठी संपुर्ण जीवण अर्पण केले.त्यांनी निर्माण केलेली शिक्षण व्यवस्था उध्दवस्त करण्याचा डाव हे शासन करत अाहे. ग्रामीण भागातील शासकीय शाळा बंद करण्याचा घाट या शासनाने घातला अाहे. कंपनी शाळा विधेयक हे गोरगरीब व अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अत्यंत घातक ठरणार अाहे. कारण कार्पोरेट कंपण्यांच्या खाजगी शाळांमध्ये विनामुल्य शिक्षण मिळणारच नाही. शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होणारच. कंपनी शाळांमुळे होणार्या शिक्षणाच्या बाजारीकरणातून शासनाचे शिक्षणाविरोधी कार्पोरेट धोरण जनसामान्यांच्या मुळावर अाघात करणारे अाहे.
शासकीय अनुदानित शाळांमध्ये गुणवत्ता यावी म्हणून शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ,माध्यमिक स्तरावर एलपी, असे कार्यक्रम सुरू केले,डिजिटल शाळा, लोकसहभागातून शाळासमृद्धी,त्यानंतर शाळांचे मूल्यमापन करून शालासिद्धी प्रणाली विकसित केली,याबद्दल सगळ्या शिक्षक आणि संस्थाचालकांनी आपले शाळांची गुणवत्ता सुधारली! असे असताना विद्यमान शाळांना पाठबळ देण्याचे सॊडून कपंन्यांना शाळा काढण्याची परवानगी देणारे विधेयक पास करून स्वतःच्याच योजनांना अविश्वास दाखविला आहे.
सरकारी शाळा बंद करुन शिक्षणाचे " कंपनीकरण " केले जात अाहे. स्वयंअर्थसहाय्यीत तत्वावर सन २०१३-१४ ते २०१६-१७ पर्यंत दहा हजार ७८१ शाळांना परवानगी देण्यात अाली अाहे. यापैकी ४ हजार ६५९ शाळा सुरुही झाल्या अाहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या १ हजार ६०६ , इंग्रजी माध्यमाच्या २ हजार ९०२ , उर्दू माध्यमाच्या १०६ , हिंदी माध्यमाच्या १४२ व कन्नड माध्यमाच्या ३ शाळांचा समावेश अाहे. राज्य शासनाने (शिक्षण विभाग) तीन वर्षांत तब्बल ५२६ परिपत्रक/जीअार काढले अाहेत. यावरुन शिक्षणासारख्या मुलभूत विषयात सरकारची उदासिनता दिसून येते. शिक्षणाचा हमी देणारा कायदा असतानाही मोफत शिक्षणाची वाट लावली जात अाहे. हे सगळे शैक्षणिक बदल अत्यंत वेगाने घडत असताना हे कोणासाठी व कशासाठी असा प्रश्न पडणे स्वाभाविक अाहे.
कंपनी विधेयकामुळे राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्चमाध्यमिक शाळांना मोठा फटका बसणार अाहे. अनुदानित शिक्षण मोडीत काढण्याचे हे षडयंत्र अाहे. २००० साली शिक्षणाचे खाजगीकरण करत कायम विनाअनुदानित धोरण राबविले. अाता सीअारसी फंडाच्या वापरासाठी कंपनी विधेकाचा अाधार घेऊन संपुर्ण खाजगीकरण करत धनदांडग्यांच्या व उद्योजकांच्या दावणीला शिक्षण बांधले.
खाजगी कंपनी शाळा विधेयक अचानक अाले का ? या विधेयकाची राज्यातील शिक्षक व पदवीधर अामदारांना (वि.प.स.) माहिती नव्हती का ? याचा एकाही शिक्षक व पदवीधर अामदारांनी गांर्भियाने विरोध केला नाही. ही खरी शिक्षण क्षेत्रातील मोठी शोकांतिका अाहे. खरे तर हे शिक्षक अामदार मुळत: शिक्षक नसल्यामुळे शिक्षण व शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी पोहचवत नाहीत. त्यांचा विरोधही दिसला तरी तो बेगडीच असतो. म्हणुनच कंपनी शाळा विधेयक पास , शिक्षक अामदार नापास.
शिक्षक व्यवस्थित शिकवत असते तर ही वेळ आली नसती .
ReplyDeleteशाळांची शैक्षणिक अवस्थेला शिक्षक जबाबदार नाही. आपण चुकीचे बोलू नये. याला शासन अधिकारी शाळांची आडीट सिस्टिम जबाबदार आहे असे मला वाटते. कृपया शिक्षकांना जबाबदार ठरवू नये.
Delete