अखेर मार्च २०१७ एच.एस.सी. परीक्षेच्या पर्यावरण शिक्षण (EVS) या विषयासाठी नेमलेल्या बहिर्गत परीक्षकांचे मानधन मिळाले.

फेब्रुवारी/मार्च २०१७ एच.एस सी.परीक्षेला पर्यावरण शिक्षण या विषयासाठी बहिर्गत परीक्षक नेमले होते. अशा परीक्षकांचे मंडळाकडून अद्याप मानधन न दिल्यामुळे बिलांवर सह्या नाहीत.

ग्रामीण भागामध्ये शाळा काॅलेज खूप दूर असल्यामुळे वारंवार फेर्‍या मारणे अशक्य अाहे. त्यामुळे अार्थिक दृष्ट्या मोठा भुर्दंड सोसावा लागतो. तसेच पर्यावरण शिक्षण (EVS) या विषयासाठी नेमलेल्या अंतर्गत परीक्षकांना सुध्दा मानधन देण्यात यावे. तसे परिपत्रक मंडळाने पारित करावे. मार्च २०१७ ची उर्वरीत देयके त्वरीत अदा करावीत. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांकडून देयके प्राप्त झाली नाहीत अशी देयके त्वरीत मागवून घ्यावीत. बहिर्गत परीक्षकांचे मानधन तात्काळ मिळण्याची कार्यवाही करावी. ही नम्र विनंती.

अाशा अाशयाचे पत्र सोमवार दिनांक २९ जानेवारी २०१८ रोजी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष व मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानदेव लक्ष्मण हांडे व राज्य संघटक व रात्रशाळा समन्वयक भानुदास शिंदे यांनी मंडळाचे सचिव मा.डाॅ. बोरसे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मा.सचिव यांनी संबधितांशी चर्चा करुन तात्काळ कार्यवाही करण्याचे अादेश दिले. परिणामी दोन दिवसांत बहुतांशी महाविद्यालयांचे धनादेश वितरित करण्यात अाले . ज्या महाविद्यालयांचे धनादेश अद्याप प्राप्त झाले नाहीत त्यांनी संघटनेचे राज्य संघटक तथा रात्रशाळा समन्वयक  भानुदास शिंदे व रात्र शाळा अध्यक्ष प्रा. वसंत भागवत यांच्याशी संपर्क साधावा.

तात्काळ कार्यवाही करुन सहकार्य केल्याबद्दल मंडळाचे  मा. सचिव , डाॅ. बोरसे साहेब यांचे मन:पुर्वक अाभार !

Comments