नियमित वेतन न मिळाल्याने राज्यातील शिक्षक शिक्षकेतर अार्थिक संकटात , अाॅफलाईन पध्दतीने सर्व उर्ववरीत महिन्यांचे पगार तात्काळ द्यावे ! अन्यथा अांदोलन !
शनिवार दिनांक १८ मार्च २०१७ रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पिय कामकाजाच्या कार्यपध्दतीत अामुलाग्र बदल करत योजनेतर (Non Plan) व योजनांतर्गत (Plan) खर्चाचे एकत्रिकरण करण्यात अाले. त्यासाठी राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेने प्रखर लढा उभा केला. परंतु प्लॅन व नाॅन प्लॅन हा भेदभाव फक्त कागदावरच दुर झाला. राज्यात अाजही अनेक जिल्ह्यांमध्ये जानेवारी २०१७ , फेब्रुवारी २०१७ , डिसेंबर २०१७ व जानेवारी २०१८ या महिन्यांचे नियमित वेतन अद्याप मिळालेले नाही.
शालार्थ वेतन प्रणाली बंद पडल्यामुळे नियमित वेतनाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला अाहे. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने २३ जानेवारी २०१८ रोजी जानेवारी २०१८ व फेब्रुवारी २०१८ या दोन महिण्यांच्या नियमित वेतनासाठी कमी पडणार्या रकमेची देयके उणे (—) प्राधिकार पत्राद्वारे काढण्याची मुभा दिली अाहे. परंतु यामध्ये ज्या जिल्ह्यांचे नियमित वेतन हे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यांचेच अद्याप झालेले नाहीत , अशा जिल्ह्यांतील वेतन विभागांतील प्रमुख (वेतन अधिक्षक ) यांना उणे (—) प्राधिकाराद्वारे पगार बिले अदा करण्याबाबत विचारणा केली असता त्या कार्यालयांमार्फत अाम्हांला मागील महिन्यांचे पगार अदा करण्याचे वरिष्ठांचे अादेश नाहीत हे सांगून अांम्ही उणे प्राधिकाराद्वारे करु शकत नाही. असा युक्तीवाद करत कोणत्याच महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही. प्रशासन व्यवस्थेत नसलेला समन्वय पुन्हा एकदा चव्हाट्यावर अाला अाहे. राज्यात सर्व शासकीय विभागातील कर्मचार्यांचे पगार वेळेवर होतात , फक्त शिक्षकांचेच पगार चार - चार महीने होत नाहीत. हक्काच्या नियमित पगारापासून वंचित ठेवणारी व्यवस्था महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये अाहे. ही खरी दुर्दैवाची बाब अाहे.
राष्ट्र घडविणार्या शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वेतन वेळेत न देणे ही खर्या अर्थाने शासन व प्रशासनाची कुचकामी भुमिका समोर येते. नियमित वेतन वेळेत न मिळाल्याने शिक्षक शिक्षकेतरांना अार्थिक संकटांचा सामना करावा लागत अाहे. विम्याचे हप्ते , गृहकर्जाचे हप्ते , वैयक्तिक कर्जाचे हप्ते , यांसाठी नाहक नाहक दंडात्मक अार्थिक भुर्दंड सोसावा लागत अाहे. यासाठी मार्च अखेर शासनाने तात्काळ अाॅफलाईन पध्दतीने उर्ववरीत सर्व महिन्यांचे वेतन अदा करावे अन्यथा राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.
Comments
Post a Comment