शालार्थ प्रणाली बंद पडल्यामुळे अाॅफलाईनने माहे जानेवारी २०१८ चे वेतन विलंबाने होण्याची शक्यता, अनेक प्रलंबीत बिलांसाठी शालार्थमध्ये Broken Period हा Tab उपलब्ध करुन देण्याची खाजगी शिक्षक संघटनेची शालेय शिक्षण विभागाकडे मागणी.

शिक्षक शिक्षकेतरांच्या पगाराची बिले तयार करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांपासून सुरु केलेली अाॅनलाईन शालार्थ वेतन प्रणाली गेली २० ते २५ दिवसांपासून बंद अाहे. वेतनाची अाॅनलाईन माहिती भरण्यात  अाली नाही. परिणामी पगार उशिरा होणार अाहेत. या प्रणालीमार्फत राज्यातील सुमारे ५ लाख ८३ हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन देण्यात येते. परंतु अाॅनलाईनमध्ये गुरफटलेल्या कर्मचार्‍यांवर मोठे अार्थिक संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली अाहे अशी चिंता संघटनेचे मुंंबई प्रदेश अध्यक्ष मनोहर कदम यांनी अशी   व्यक्त केली.

माहे जानेवारी २०१८ व फेब्रुवारी २०१८ या दोन महिण्यांचे वेतन उशिरा होण्याची शक्यता अाहे. खरे तर शासनाने वेळेतच उपाय योजना करणे अावश्यक होते. जेणेकरुन कोणत्याही कर्मचार्‍याचे वेतन थांबणार नाही.

अाज मंत्रालयात मा. प्रधान सचिव , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याशी राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेने अाॅफलाईन पध्दतीने राज्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन करण्याची मागणी केली. तसेच शालार्थ प्रणाली सुरु करताना Broken Period हा Tab उपलब्ध करुन द्यावा. जेणेकरुन एप्रिल २०१७ पासून अाज मितीपर्यंत फरक बिले (Arreares) अाॅनलाईन प्रणालीद्वारे अदा करणे सोपे होईल.

अाज गुरुवार, दिनांक १ फेब्रुवारी २०१८ रोजी मंत्रालयात मा. कक्ष अधिकारी , शालेय शिक्षण (नियोजन व वित्त) यांच्याशी चर्चा केली असता असे समजले की, अाॅफलाईन पगारासाठी मा.अर्थमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठवला अाहे. तसेच वित्त विभागाकडेही एक प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेला अाहे. वित्त विभागातील मा. सह सचिव यांच्याशी चर्चा केली असता असे समजले की, वित्त विभागाचे मा. प्रधान सचिव  यांच्याकडे प्रस्ताव अाहे. लवकरच अाॅफलाईन पध्दतीने पगार करण्याची परवनगी मिळेल अशी अपेक्षा अाहे.

अनुदान न देणे , अनुदान दिले ते २०% , त्याचे वेतन लेखाशिर्ष प्लॅनमध्ये म्हणुन वेळेवर पगार नव्हता. कसाबसा प्लॅन टू नाॅन प्लॅन करत अनिवार्य खर्चात अाले. अाता अाॅनलाईन शालार्थ प्रणालीच बंद ! नियमित पगाराचे स्वप्न ,स्वप्नच राहीले. हक्काचा पगार तो सुध्दा वेळेत मिळणार नाही. ही खरी शिक्षण व्यवस्थेतील शोकांतीका अाहे.

Comments