अघोषित शाळा घोषित करण्यासाठी कृती समितीचे अांदोलन सुरुच! अांदोलन तिव्र करण्यासाठी खाजगी शिक्षक संघटनेचा सक्रिय सहभाग! अंदोलनास राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे यांनी दिली भेट.
घोषित शाळा घोषित करण्यासाठी अाझाद मैदानावर गेली सोळा दिवस अंदोलन सुरु अाहे. नागपूर हिवाळी अधिवेशन २०१७ मध्ये दिलेल्या अाश्वासनानुसार १ व २ जुलै च्या शाळांना अनुदान मंजुर केले अाहे.तसेच उर्वरीत अघोषित शाळांना घोषित करुन अनुदान सुरु करण्याची मागणी अाहे. त्यासाठी अांदोलन तिव्र करण्यासाठी राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचा सक्रिय सहभाग अाहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब व माजी खासदार निलेश राणे साहेब यांनी अांदोलनास भेट दिली. उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे. अाज मी लगेच मा.मुख्यमंत्री व मा. शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन अधिवेशनात अघोषित शाळा घोषित करणेबाबत बोलतो. राणे साहेबांनी असे प्रतिपादन केले. परंतु जोपर्यंत शिक्षण मंत्री महोदय सभागृहात प्रचलित टप्प्यानुसार अनुदान सुरु करत नाही व अघोषित शाळांना घोषित करत नाही तोपर्यंत अाझाद मैदानावर सुरु असलेले अमरण उपोषण सुरुच राहील. अशी भूमिका जगदाळे सर यांनी घेतली. या प्रसंगी खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष व मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानदेव हांडे यांनी विषयाचे गांभिर्य लक्षात अाणून देत चर्चा केली. राज्य संघटक तथा रात्र शाळा अध्यक्ष भानुदास शिंदे उपस्थित होते.
शरद तुळशिराम माने
मुंबई प्रसिध्दी प्रमुख,
राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य.
मुंबई प्रसिध्दी प्रमुख,
राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य.

Comments
Post a Comment