सॅप प्रणालीतील गोंधळामुळे मुंबई महानगरपालिका शिक्षक कामावर येऊन देखील पगाराविना !

सॅप प्रणालीतील गोंधळामुळे मुंबई महानगरपालिका शिक्षक कामावर येऊन देखील पगाराविना !

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सर्व कामगार कर्मचार्‍यांसाठी दोन वर्षांपासून सुरु केलेली सॅप प्रणालीच्या सदोषीकणामुळे प्रत्येक महिण्याला याना त्या प्रकारे नाहक पगार कपातीला शिक्षकांना सामोरे जावे लागत अाहे. पालिकेच्या प्राथमिक,माध्यमिक शाळांमध्ये काम करणार्‍या हजारो शिक्षकांना सॅपचा तडाखा बसला अाहे. महिणाभर वेळेवर अाणि नियमित शाळेत  येऊन देखील सॅप प्रणालीने शिक्षकांना पगारापासून वंचित ठेवले अाहे. ज्या शिक्षकांना पगार अाला अाहे त्यांच्या पगारातून पन्नास ते पंचावन हजार रुपये कापून केवळ शंभर ते हजार रुपयांपर्यंतच पगार मिळाला अाहे. त्यामुळे हक्काच्या पगारापासून वंचित राहून अनेक अार्थिक संकटांचा सामना या सॅप प्रणालीमुळे करावा लागत अाहे.

पेपरलेस कारभार करण्याच्या उद्देशाने अाणि खर्चात बचत करण्याच्या हेतूने पालिका प्रशासनाने सुमारे कामगार-कर्मचारी वर्गासाठी प्रचलित पगार देण्याची पध्दत बंद करत दोन वर्षांपासून सॅप प्रणाली अंमलात अाणली. परंतु सॅप प्रणालीतील त्रुटी दूर करण्याबाबत मानव संसाधन विभाग व संबधित अस्थापनांनी गांभिर्याने लक्ष दिले नाही. त्या त्या अस्थापनांनी प्रत्येक शिक्षकाची अचूक माहिती ई-मेलद्वारे मुख्यालयाकडे न पाठविल्याने शिक्षकांना जबर पगार कपातीस सामोरे जावे लागले.

सॅप प्रणालीतील नियमावली तयार करताना शिक्षकांच्या कार्यप्रणालीचा विचार खर्‍या अर्थाने केला नसल्याने ही समस्या उद्भवली अाहे. नियमित शिक्षकांबरोबरच स्पेशल शिक्षकही पालिकेत कार्यरत अाहेत. स्पेशल शिक्षकांना दररोज किंवा अाठवड्यातून वेगवेगळ्या शाळांमध्ये विशेष म्हणजे वेगवेगळ्या अधिवेशनांमध्ये (सकाळ/दुपार) काम करावे लागत अाहे. त्यातच शिक्षकांना वेगवेगळ्या स्पर्धा , प्रशिक्षणे , बैठका , कार्यशाळांनाही उपस्थित रहावे लागते. त्यामुळे रोजच्या वेळेपेक्षा इतर वेळेलाही ड्युटी करावी लागते. या सार्‍या बदलांची योग्य ती नोंद सॅप प्रणालित नसल्यामुळे शिक्षकांना काम करुन देखील पगारापासून वंचित रहावे लागते.

खरे तर याला जबाबदार असणार्‍या प्रशासन अधिकारी , संबधित कारकून , प्रशासन अधिकारी (शाळा) यांच्यावर पालिका कर्मचारी सेवा अधिनियमानुसार कठोर कारवाई करणे अावश्यक अाहे. तसेच सॅप प्रणालीचा गोंधळ पुरता मिटत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या पगारातून कोणतीच कपात करु नये. अन्यथा शिक्षकांच्या संतापाचा उद्रेक होईल

Comments