उच्च न्यायालयाच्या विरोधात राज्य सरकार सुप्रिम कोर्टात, मुंबईतील खाजगी अनुदानित/अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांचे पगार विलंबानेच!


मुंबईतील अनुदानित/अंशत: अनुदानित शाळांमधील सुमारे २७ हजार शिक्षक शिक्षकेतरांचे पगार अद्याप झालेले नाहीत. अाज मंत्रालयात राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य संघटक व रात्रशाळा समन्वयक भानुदास शिंदे अाणि राज्य कनिष्ठ महाविद्यालय समितीचे राज्य प्रवर्तक प्राध्यापक उदय सुपेकर यांच्यासह मा. शिक्षण उपसचिव ,चारुशिला चौधरी मॅडम यांची भेट घेतली असता असे समजले की राज्य सरकार ९ फेब्रुवारी २०१८ च्या (मुंबै बॅंक/युनियन बॅंक) उच्च न्यायालयाच्या  विरोधात सुप्रिम कोर्टात गेल्यामुळे  पगाराबातचा निर्णय पुढील अाठवड्यात होईल. म्हणजे पगार विलंबानेच होणार हे नक्की ! नियमित पगार न झाल्यामुळे गृहकर्ज , विमा हप्ते , वैयक्तिक कर्ज व इतर हप्ते थकल्याने बॅंकांनी त्यावर दंड लावले अाहेत. श्रेयवादाच्या राजकारणामुळे अांम्हा सर्वसामान्य शिक्षकांना नाहक मोठा अर्थिक भुर्दंड सोसावा लागत अाहे.
शालार्थ प्रणाली बंद झाल्यामुळे मागील महिन्यात अाॅफलाईनने पगार काढले तेही विलंबानेच! कसाबसा तो महिना गेला अाता अार्थिक वर्ष अखेर वैद्यकीय बिले ,फरकाची  बिले व इतर फरकाची बिले काढण्याची वेळ अाली त्यातही हायकोर्ट , सुप्रिम कोर्ट प्रकार सुरु झाल्यामुळे विलंब निश्चितच! राजकीय श्रेयामध्ये सामान्य शिक्षकांची पुरती अार्थिक कोंडी झाली अाहे. मुंबई सारख्या अार्थिक राजधानीत पगाराविना दिवस काढणे कठीणच अाहे. हक्काच्या पगारासाठी एवढा त्रास होणे ही शिक्षणातील श्रेयवादी राजकारणाची शोकांतिका अाहे. राजकीय श्रेयवाद संपून लवकरच अच्छे दिन येवो हीच अपेक्षा!

Comments

  1. BJP Sarkar really bad one

    ReplyDelete
  2. असले नालायक शिक्षण मंत्री, आणि त्याच्या पुढे हा टेकणारे मुख्यमंत्री दुर्मिळ आहे. मंत्रालयात स्वता:चे पगार निर्लज्जपणे एकमताने मंजूर करणारे हे सरकार भिकार आहे

    ReplyDelete

Post a Comment