गुणांची सूज उतरली परंतु पालकांच्या पायाला येणाऱ्या सुजेचे काय ?
या वर्षी शालांत परीक्षेचा निकाल कमी लागल्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी कसरत करावी लागणार आहे. तेरा वर्षांतील सर्वाधिक कमी निकाल या वर्षीचा आहे. सीबीएससी बोर्ड 91.10% , आयसीएससी बोर्ड 98.94% यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 77.10% आहे. यामुळे महाविद्यालयीन प्रवेशासाठी महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी कितपत टिकणार? सुमारे चार लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले सुमारे त्यांचे काय ? निकालाचा एवढा टक्का घसरण्याचे कारण काय ? निकालाचा घसरता टक्का पाहता महाराष्ट्र बोर्डाचा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इतर बोर्डाच्या तुलनेत प्रवेशासाठी दुय्यम स्थान मिळणार.
" गुणांची सूज उतरली " असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्र्यांनी केले असले तरी प्रवेशासाठी पालकांच्या पायाची सूज मात्र नक्की वाढणार आहे. जर राज्याच्या निकालाने गुणांची सूज उतरली मग सीबीएसई आयसीएससी बोर्डाच्या गुणांची सूज उतरून समानता शिक्षणमंत्री महोदय यांनी प्रस्थापित करावी. कारण केंद्रातील सरकारही आपलेच आहे. फक्त सीबीएसई व आयसीएसई विद्यार्थ्यांनी पुढे जावे , राज्याच्या नाही ? मग शाळांचे वीस गुण बंद करून आपण काय साध्य केले ? राज्य बोर्डाच्या मुलांना इतर बोर्डांच्या तुलनेत मागे आणून आपणास काय साध्य करायचे आहे ? पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या पायपेटी ने पायांना येणाऱ्या सुजेचे काय ? पायपीट करूनही मनाजोगे महाविद्यालय मिळाले नाही तर नैराश्य पदरी येणे स्वाभाविक आहे!
Comments
Post a Comment